Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 7, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
साकळी : शेतीत नावीन्य, प्रयोगशीलता आणि जिद्दीच्या बळावर मोठे यश संपादन करणारे साकळी येथील प्रगतिशील शेतकरी दीपक रमेश महाजन यांना प्रतिष्ठेचा ‘कृषीसेवक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रावेर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आमदार अमोलदादा जावळे व जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या गौरवामुळे साकळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
साप्ताहिक कृषीसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दीपक महाजन यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक्स्पोर्ट दर्ज्याची केळी उत्पादन घेऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केळीबरोबरच त्यांनी रेशीम शेतीतही उल्लेखनीय उत्पादन घेतले असून जैविक शेतीचे तंत्र आत्मसात करून प्रत्यक्ष शेतात यशस्वी प्रयोग राबवले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न आणि दर्जेदार उत्पादन हा त्यांचा शेतीचा मूलमंत्र ठरला आहे.
शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग, पीक व्यवस्थापनातील शास्त्रीय दृष्टिकोन आणि बाजारपेठेचा अभ्यास यामुळे दीपक महाजन हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत.
प्रगतिशील शेतकरी रमेश रामजी महाजन यांचा समृद्ध शेतीचा वारसा पुढे नेत दीपक महाजन यांनी आधुनिकतेची जोड दिली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा सन्मान म्हणजे केवळ एका शेतकऱ्याचा गौरव नसून, प्रयोगशील शेतीच्या दिशेने टाकलेले प्रेरणादायी पाऊल असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

Next Post

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

Next Post

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..