Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच भाजपा देशात प्रथमस्थानी – रविंद्र पाटील

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 6, 2026
in राजकीय
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
साकळी येथे भारतीय जनता पार्टीचा 46 वा वर्धापन दिन साकळी येथील विविध कार्यकारी सोसायटीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र (छोटू भाऊ) सूर्यभान पाटील यांनी ठामपणे प्रतिपादन केले की, “भाजपा आज देशात प्रथमस्थानी आहे, यामागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत आणि निष्ठा हीच खरी ताकद आहे.”
ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी ‘घर घर भाजपा’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाची भक्कम पायाभरणी केली आहे. याच निष्ठेमुळे आज देशात भाजपा सरकार सक्षमपणे कार्यरत आहे.
कार्यक्रमात भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. त्यांनी भाजपा पक्षाची भूमिका, कार्यपद्धती आणि जनहितासाठी केलेल्या कामांची माहिती सविस्तरपणे मांडली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भाजपा कार्यकर्ते योगेश खेवलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप (भैया) प्रभाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटू भाऊ) सूर्यभान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे सभापती उज्जेनसिंग राजपूत, संचालक नानासो विलास चंद्रभान पाटील, युवक जिल्हा पदाधिकारी संजय पाटील (किनगाव), भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, जेष्ठ कार्यकर्ते सैय्यद अहमद सैय्यद मिरा, तसेच दहिगाव व परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
यामध्ये देविदास पाटील, सैय्यद मोईद्दीन, प्रताप बडगुजर, सुनिल वाणी, वसिम खान, नसीर खान, पंढरीनाथ पाटील, विलास काळे, विलास पवार, नितीन फनाटे, मोहन बडगुजर, सर्फराज तडवी, किसन महाजन, नूतनराज बडगुजर, राजू सोनवणे, नाना भालेराव, सिद्धार्थ जंजाळे, शाहरुख खान, दर्पण खेवलकर यांच्यासह साकळी व चुचाळे परिसरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात अधिक जोमाने पक्षविस्तार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

साकळीत क्रांतीसूर्यांच्या विचारांचा जागर: ११ एप्रिलला भव्य जाहीर व्याख्यान!

Next Post

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

Next Post

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..