Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 10, 2026
in धार्मिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
समाजजागृती, शिक्षण आणि समानतेचा संदेश देणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साकळी येथे उद्या दि. ११ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विशेष व्याख्यानासाठी प्रख्यात वक्ते श्री राजेंद्र माळी (वाघळीकर) उपस्थित राहणार असून ते “मी ज्योतिराव फुले बोलतोय!” या प्रभावी एकपात्री प्रयोगातून महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्याचा जिवंत आढावा सादर करणार आहेत. त्यांच्या या प्रयोगातून शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी लढणाऱ्या फुले यांच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.
महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही तितकाच ज्वलंत आहे —
“शिक्षण हेच खरे शस्त्र आहे”
“ज्याला ज्ञान नाही तो अंध आहे”
“समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच खरी मानवता”
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक समतेचा मार्ग दाखवणारे आणि जातीभेदाच्या व्यवस्थेला धैर्याने आव्हान देणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त माळी समाज साकळी प्रेरित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले असून, समाजातील सर्व घटकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, युवक, महिला तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनाच्या पर्वाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
साकळीमध्ये उद्या फुले विचारांचा गजर होणार, परिवर्तनाची नवी ज्योत पेटणार!

Previous Post

हेमल गांधी पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांचा वर्षाव; मनवेल येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

हे षडयंत्र आमच्यासाठी नवं नाही, अक्षय कर्डिलेच आमदार होणार, नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

Next Post

हे षडयंत्र आमच्यासाठी नवं नाही, अक्षय कर्डिलेच आमदार होणार, नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..