Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान…! दोन नंबर गेट बंद केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप…! प्रशासन मनमानीपणा आणि दुजाभाव करत असल्याचा आरोप…!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 4, 2026
in धार्मिक
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानअंतर्गत प्रशासनाने काही फेरबदल केले आहेत. त्यामध्ये दोन नंबरचं गेट नट बोल्ट लावून बंद करण्यात आलं आहे. मात्र यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासन मनमानीपणा आणि दुजाभाव करत असल्याचा आरोप केला जात
आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं बोललं जात आहे.



शनिशिंगणापूर या गावात राहणाऱ्या आणि आजूबाजूच्या गावातल्या कोणाच्याही घरी लग्न असलं की नवरदेव नवरी शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात. एखाद्याने नवीन चार चाकी वाहन खरेदी केलं तर त्या वाहनाची पूजा सर्वात प्रथम शनिदेवाच्या स्वयंभू शिळेच्या साक्षीनं केली जाते. परंतू प्रशासनाने देवस्थान परिसरातलं दोन नंबरचं गेट बंद केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या शनिभक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी दोन नंबरचं हे गेट सुरु होतं. परंतू सुरक्षेच्या कारणास्तव हे गेट बंद करण्यात आलं. सुरक्षेचा मुद्दा यापूर्वी कधीच शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात उपस्थित झाला नाही. मात्र प्रशासन सुरक्षेचं कारण पुढे करुन स्थानिक ग्रामस्थ आणि शनिभक्तांची अडणूक करत असल्याचा आरोप प्रशासनावर केला जात आहे. सर्वसामान्य शनिभक्तांना दोन नंबर गेट बंद असताना काही पोलीस अधिकाऱ्यांचे मित्र किंवा नातेवाईक दर्शनासाठी आले असता हे गेट उघडलं जात असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप असून यासाठी या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्या कॅमेर्‍यांचे ‘फुटेज’ ‘चेक’ करण्याचा दावासुद्धा केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं दिली असून त्याकडे दुर्लक्ष केल जात असल्याचंदेखील या निमित्तानं बोललं जात आहे.



भाविकांना शिस्त लावण्यासाठीच हा निर्णय…!

वास्तविक पाहता शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात दोन नंबरचे गेट हेच मुळात ११ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलं आहे. या गेटचा स्थानिक ग्रामस्थ आणि शनिभक्तांना कुठलाच फायदा होत नाही. हे गेट बंद असल्यामुळे कोणाचीच अडचण होत नाही‌ प्रशासनाचा यामागे कोणाची अडवणूक करण्याचा अजिबात हेतू नाही. शनिशिंगणापूरच्या स्थानिक ग्रामस्थांना शनिदेवाचं दर्शन व्यवस्थितपणे घेता यावं, यासाठी ‘गावकरी गेट’ अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दोन नंबरचे गेट बंद करण्यात आलं असून यामुळे दर्शन व्यवस्थेत कुठलीही अडचण येत नाही. भाविकांना शिस्त लागावी, यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.



अतुल चोरमारे
कार्यकारी अधिकारी
शनिशिंगणापूर देवस्थान, शनिशिंगणापूर

Previous Post

रावेर तालुक्यात भरदिवसा वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल प्रशासन झोपेत की संगनमत?

Next Post

पोलीस उपनिरीक्षक श्री .बाळासाहेब कोबरने यांचा लवकरच भव्य दिव्य नागरी सत्कार

Next Post

पोलीस उपनिरीक्षक श्री .बाळासाहेब कोबरने यांचा लवकरच भव्य दिव्य नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..