Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जलजीवन मिशन घोटाळा; अहिल्यानगरच्या 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 8, 2026
in शासकीय
0
जलजीवन मिशन घोटाळा; अहिल्यानगरच्या 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

जलजीवन गैरव्यवहारप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठीच्या लढ्याला यश

खासदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर : प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२२-२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील कथित गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेतील अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात सातत्याने आवाज उठविल्यानंतर राज्य शासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील दोन कार्यकारी अभियंते व दोन उपअभियंत्यांना निलंबित केले आहे. जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी उभारलेल्या लढ्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याची प्रतिक्रिया अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता जी. एस. भोगावडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता एस. आर. वारे, उपअभियंता एस. एस. दहिफळे आणि तत्कालीन उपअभियंता एम. पी. धगधगे यांचा समावेश आहे. जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये गंभीर त्रुटी, अनियमितता आणि निष्काळजीपणा आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

खासदार नीलेश लंके यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा तत्कालीन आमदार असतानाच सुरू केला होता. डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमधील कथित गैरव्यवहार विधानसभेत मांडला होता. निविदा प्रक्रियेत अपात्र ठेकेदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरविण्यात आल्याचा तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला होता.

विशेषतः पारनेर तालुक्यातील जामगावसह सहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा त्यांनी पुराव्यांसह उपस्थित केला होता. संबंधित योजनेत केवळ २५ ते ३० टक्के काम पूर्ण झाले असताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून बनावट पूर्णत्व अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल झाली असून, जनतेला मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

लोकसभेवर निवडून गेल्यानंतरही खासदार लंके यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला. संसदेत त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व जलजीवन मिशन योजनांचे स्वतंत्र ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याची मागणी केली. कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आलेल्या परंतु प्रत्यक्षात अपूर्ण असलेल्या योजनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती

Previous Post

“बेघरांच्या न्यायासाठी लढा तीव्र! २९ जूनपासून सुरू असलेले आमरण उपोषण कायम; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक निदर्शने, शासनाविरोधात संतापाचा उद्रेक!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जलजीवन मिशन घोटाळा; अहिल्यानगरच्या 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

जलजीवन मिशन घोटाळा; अहिल्यानगरच्या 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

July 8, 2026
“बेघरांच्या न्यायासाठी लढा तीव्र! २९ जूनपासून सुरू असलेले आमरण उपोषण कायम; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक निदर्शने, शासनाविरोधात संतापाचा उद्रेक!”

“बेघरांच्या न्यायासाठी लढा तीव्र! २९ जूनपासून सुरू असलेले आमरण उपोषण कायम; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक निदर्शने, शासनाविरोधात संतापाचा उद्रेक!”

July 8, 2026
तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

July 7, 2026
भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

July 7, 2026
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

July 7, 2026
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

July 7, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..