Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

“सुदृढ मातृत्वाकडे साकळीची दमदार वाटचाल! ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात गरोदर मातांना प्रोटीन पावडरचे वाटप”

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 9, 2026
in राजकीय, सामाजिक
0
“सुदृढ मातृत्वाकडे साकळीची दमदार वाटचाल! ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात गरोदर मातांना प्रोटीन पावडरचे वाटप”

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
ग्रामीण भागातील माता व बालकांचे आरोग्य अधिक सक्षम आणि सुदृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “माझं गाव आरोग्यसंपन्न गाव” अभियानाला साकळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे आयोजित करण्यात आलेल्या गरोदर माता आरोग्य तपासणी व प्रोटीन पावडर वाटप शिबिरात मोठ्या संख्येने गरोदर महिलांनी सहभाग घेतला.
या शिबिरात साकळीचे सरपंच दिपक नागो पाटील यांच्या हस्ते गरोदर मातांना पोषणमूल्यांनी समृद्ध प्रोटीन पावडरचे डबे वितरित करण्यात आले. यावेळी त्यांनी गरोदर मातांनी नियमित आरोग्य तपासणी करून योग्य आहार, औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे, असे आवाहन केले. माता आणि बालकांचे उत्तम आरोग्य हेच सुदृढ समाजाचे खरे बळ असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात गरोदर महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना संतुलित आहार, हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक पोषण, लसीकरण, नियमित तपासणी, प्रसूतीपूर्व काळजी आणि नवजात बाळाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहितीही उपस्थित महिलांना देण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद गजाला नदीम अख्तर, आरोग्य सहाय्यक राजू तडवी, आरोग्य निरीक्षक नितीन वाळुंज, आरोग्य सेविका रमा पवार, आरोग्य सेविका मनीषा कोळी, अधीपरिचारिका वृषाली पाटील, आशा सुपरवायझर लीना पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी अंतर्गत कार्यरत सर्व आशा सेविका, उपकेंद्र शिरसाड अंतर्गत आशा सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या संख्येने गरोदर माता या शिबिरात सहभागी झाल्या. उपस्थित महिलांनी आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत करत अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
“माझं गाव आरोग्यसंपन्न गाव” अभियानांतर्गत साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राने आयोजित केलेला हा उपक्रम गरोदर मातांच्या पोषण, आरोग्य संरक्षण आणि सुरक्षित मातृत्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला असून, ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठीही हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.

Previous Post

“एक झाड प्रत्येकाने लावा; पर्यावरण वाचवा!” यावल तहसील कार्यालयात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

Next Post
राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..