Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 9, 2026
in क्राईम
0
राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

अहिल्यानगर |प्रशांत बाफना
समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली. सूरज बाबासाहेब वांढेकर (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तांत्रिक तपासाच्या आधारे त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या समाजमाध्यम खात्याचा गैरवापर करून संबंधित पोस्ट प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले आहे.

बुधवारी (दि. 8) संबंधित आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पाथर्डी शहरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाथर्डी पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. निवेदनाद्वारे वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सखोल तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. घटना घडल्यानंतर आंदोलकांना दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने तपास पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात आल्याने पाथर्डी पोलीस, सायबर सेलच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

सायबर तपासातून आरोपीचा पर्दाफाश
घटनेनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाथर्डी पोलीस आणि अहिल्यानगर सायबर सेलने तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान सूरज बाबासाहेब वांढेकर याने दुसऱ्या व्यक्तीच्या समाजमाध्यम खात्याचा ॲक्सेस मिळवून त्यांच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपी सूरज बाबासाहेब वांढेकर याला तिसगावमधून जेरबंद केले.

निष्पाप व्यक्तीवरील संशय दूर
संबंधित पोस्ट देविदास चंद्रभान शिरसाठ (रा.शिरसाटवाडी, ता.पाथर्डी) यांच्या नावावरील फेसबुक खात्यावरून प्रसारित झाल्यामुळे प्रारंभी संशय त्यांच्यावर गेला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासातून खरा आरोपी शोधून काढल्याने एका निष्पाप व्यक्तीवर अन्याय होण्यापासून बचाव झाला. त्यामुळे समाजात निर्माण होणारा गैरसमजही दूर झाला

Previous Post

“सुदृढ मातृत्वाकडे साकळीची दमदार वाटचाल! ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात गरोदर मातांना प्रोटीन पावडरचे वाटप”

Next Post

मतदानापासून रोखण्यासाठी संचालकाचे अपहरण, भाजप नेत्याच्या भावाला पळवून नेले जिल्हा बँकेच्या ठरावाचे राजकारण तापले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..