Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कायद्याचा धाक कायम! रावेर पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा कट पाठलाग, थरार आणि धाडसी कारवाई; दोन आरोपी हत्यारे व बनावट नोटांसह जेरबंद, तिघे फरार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 11, 2026
in क्राईम
0
कायद्याचा धाक कायम! रावेर पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा कट पाठलाग, थरार आणि धाडसी कारवाई; दोन आरोपी हत्यारे व बनावट नोटांसह जेरबंद, तिघे फरार

रावेर | प्रतिनिधी आदित्य गजरे: रावेर शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा रावेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कट उधळून लावला. थरारक कारवाईदरम्यान दोन आरोपींना हत्यारे, बनावट नोटा आणि दरोड्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह जेरबंद करण्यात आले असून, टोळीतील तिघेजण शेतशिवारातून पसार झाले आहेत. या कारवाईमुळे रावेर शहरातील संभाव्य मोठा गुन्हा टळला असून रावेर पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.दि. ९ जुलै २०२६ रोजी पाल क्षेत्रात गस्तीदरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या ईको कारमधून पाच ते सहा संशयित इसम पाल परिसरात फिरत असून ते रावेर शहराच्या दिशेने जात आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सूचना देत दोन्ही बाजूंनी नाकाबंदी व शोधमोहीम सुरू केली.आभोडा गावाजवळ संशयित वाहन भरधाव वेगाने मोटारसायकलींना कट मारत पळून जात असताना पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. रावेर शहरातील आठवडे बाजार मार्गे बऱ्हाणपूर रोडवरील शेताजवळ आरोपींनी वाहन सोडून पळण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहन चिखलात अडकल्याने त्यांचा डाव फसला. दरम्यान, पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी दोन आरोपींना पकडले, तर इतर तिघेजण अंधार व शेतशिवाराचा फायदा घेत पसार झाले. जमावाच्या तावडीत सापडलेल्या दोघांना पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वाहनाची झडती घेतली असता एक लोखंडी तलवार, पेंचीस, टॉमी, लाल मिरची पावडर, दोरखंड, तसेच ₹५০০ दर्शनी मूल्याच्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या बनावट नोटा (एकूण दर्शनी किंमत ₹३ लाख) आणि मारुती सुझुकी ईको (क्रमांक MH-19-EA-2403) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपी रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निखील प्रविण पाटील (वय २०) व अल्ताफ जलाल शेख (वय २६), दोघेही रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासार वडवली, जि. ठाणे अशी आहेत. तर मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) व त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच रावेर गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

Previous Post

मतदानापासून रोखण्यासाठी संचालकाचे अपहरण, भाजप नेत्याच्या भावाला पळवून नेले जिल्हा बँकेच्या ठरावाचे राजकारण तापले

Next Post

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे मिडसांगवी मध्ये पहिले रिंगण पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..