Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मतदानापासून रोखण्यासाठी संचालकाचे अपहरण, भाजप नेत्याच्या भावाला पळवून नेले जिल्हा बँकेच्या ठरावाचे राजकारण तापले

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 10, 2026
in क्राईम, राजकीय
0
मतदानापासून रोखण्यासाठी संचालकाचे अपहरण, भाजप नेत्याच्या भावाला पळवून नेले जिल्हा बँकेच्या ठरावाचे राजकारण तापले

पारनेर तालुक्यात खळबळ

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रियेची तयारी सुरू असताना पारनेर तालुक्यातील तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील दोन संचालकांच्या अपहरणापाठोपाठ लोणी हवेली येथे असाच प्रकार घडला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष चांगदेव दुधाडे यांनी त्यांच्या भावाला मतदानापासून रोखण्यासाठी पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सुभाष दुधाडे (वय ५५) हे लोणी हवेली येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात. ते भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस आहेत. गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ठरावासाठी १३ जुलै रोजी निवडणूक होणार असून, त्यामध्ये संचालक मंडळ मतदान करणार आहे. या मतदानात त्यांचे भाऊ शिवाजी चांगदेव दुधाडे हे मतदार आहेत.
दुधाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून त्यांचे भाऊ शिवाजी दुधाडे हे बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे आढळून आले. दरम्यान, रात्री सुमारे ९.५१ वाजता गावातील अमोल विक्रम दुधाडे, जो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा कार्यकर्ता आणि विद्यमान उपसरपंच असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे, त्याने संभाजी दुधाडे यांना फोन करून शिवाजी आप्पांना कोणत्या गोळ्या चालू आहेत, ते सांगा. ते माझ्यासोबत आहेत, असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर सुभाष दुधाडे, संभाजी दुधाडे आणि इतर नातेवाईकांनी शिवाजी दुधाडे यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तसेच अमोल दुधाडे यांचाही मोबाईल बंद आढळून आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. शिवाजी दुधाडे हे घरी परतले नसून, सोसायटीच्या ठराव बैठकीत त्यांनी त्यांच्या पसंतीच्या गटाला मतदान करू नये, या उद्देशाने अमोल विक्रम दुधाडे यांनी त्यांना पळवून नेऊन कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.या प्रकरणामुळे लोणी हवेलीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत

Previous Post

राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

Next Post

कायद्याचा धाक कायम! रावेर पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा कट पाठलाग, थरार आणि धाडसी कारवाई; दोन आरोपी हत्यारे व बनावट नोटांसह जेरबंद, तिघे फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..