Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; सोयाबीन, उडीद, मुग पिकांनी टाकल्या माना.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 15, 2026
in ताज्या बातम्या
0
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; सोयाबीन, उडीद, मुग पिकांनी टाकल्या माना.

जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; पाणीटंचाईमुळे शेतकरी चिंतेत..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
जामखेड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या अनिश्चिततेचे मोठे संकट ओढवले आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, मुग तसेच इतर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवण झालेली पिके करपण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी कर्ज काढून, महागडे बियाणे व खते खरेदी करून पेरणी पूर्ण केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. परंतु त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. सध्या शेतातील पिके पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

हवामान विभागाकडून अधूनमधून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस होत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे उशिरा आणि जोरदार पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊन आर्थिक फटका बसणार आहे.

पावसाअभावी तालुक्यातील नदी, नाले आणि ओढे कोरडे पडले असून अनेक ठिकाणी विहिरींनीही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.

सध्या आषाढी वारीचा उत्साह राज्यभर सुरू असताना जामखेड तालुक्यातील बळीराजा मात्र पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांकडे आशेने पाहत आहे. “पांडुरंगा, चांगला पाऊस पाड आणि आमची शेती वाचव” अशी साकडे शेतकरी घालत असून सर्वांचे लक्ष आता येणाऱ्या काही दिवसांतील पावसाकडे लागले आहे.
दरम्यान, कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यास काही प्रमाणात परिस्थिती सुधारू शकते. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगामावर मोठे संकट ओढवून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

बनावट शालार्थ आयडी घोटाळा: धुळ्यानंतर आता जळगावात भूकंप होणार? अनेक ‘मोठे मासे’ रडारवर!

Next Post

शासन निर्णयाला बगल जळगावच्या महाविद्यालयाकडून आदिवासी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर प्रवेश शुल्क वसुलीअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे कडून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..