Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील मोहरद चांदण्या तलाव भागात वनविभागाच्या बंधाऱ्याला भेगा पडून फुटण्याच्या मार्गावर, वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 2, 2026
in शासकीय
0
चोपडा तालुक्यातील मोहरद चांदण्या तलाव भागात वनविभागाच्या बंधाऱ्याला भेगा पडून फुटण्याच्या मार्गावर, वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा : चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील मोहरद येथील चांदण्या तलाव परिसरात वनविभागा मार्फत जंगलातील चालू वर्षी वन्यप्राण्यांसाठी पाणी आडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इस्टिमेटनुसार काम न करता हे काम घाईघाईत उरकल्याने पहिल्याच पावसात बंधाऱ्याच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.

माहितीनुसार, जे काम जेसीबीच्या साह्याने 8 ते 10 दिवसात पूर्ण व्हायला हवे होते ते अवघ्या 4 दिवसात उरकून टाकण्यात आले. यामुळे बांधकामाचा दर्जा अत्यंत खालावला आहे.

चांदण्या तलावाजवळून जाणारा साईझिरा नाला हा बारमाही वाहणारा जिवंत नाला आहे. या ठिकाणी जर 12 महिने पाणी साठवणारा बंधाराचे काम चांगले झाले असते तर उन्हाळ्यात जंगलातील प्राणी, पक्ष्यांची तहान भागली असती. मात्र सध्याच्या परिस्थितीत बंधारा पहिल्याच पुरात कमकुवत झाल्याने फूटण्याच्या मार्गावर आहे वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच चांदण्या तलाव व परिसरातील ग्रामस्थांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे सरचिटणीस तथा पत्रकार उपसंपादक मन्सूर एस. तडवी यांच्याशी संपर्क साधून पाहणी करण्याची विनंती केली. पाहणी दरम्यान बांधकामाच्या खालची भिंती ला भेगा पडलेल्या असून भिंतींना कुठेच पिचिंग करून आढळून आली नाही आणि मेन भिंतिची उंची खूपच कमी असल्याने भेगामुळे बंधारा फुटण्याच्या मार्गावर आहे जर बंधारा फुटला तर त्याच्याखाली मोठे पाझर तलाव आहे त्या बंधारातील पाण्याच्या प्रवाहमुळे खालचे पाझर तलाव पण फुटू शकतो आणि त्याच्या खालीलच वस्ती आहे या कामा मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत

याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वनविभागाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाला असून जंगल संवर्धनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

उप संपादक मन्सूर तडवी,

Previous Post

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

Next Post

मोहराळ्यात अवैध दारूधंद्यावर संतप्त ग्रामस्थांचा एल्गार; कारवाई न झाल्यास भीम आर्मीतर्फे आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..