Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सिव्हिल सर्जन कार्यालयातील हलगर्जीपणाचा पर्दाफाश; निवृत्त कर्मचाऱ्याकडेच कपाटाची चावी, माहिती अवलोकन रखडले

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 4, 2026
in शासकीय
0
सिव्हिल सर्जन कार्यालयातील हलगर्जीपणाचा पर्दाफाश; निवृत्त कर्मचाऱ्याकडेच कपाटाची चावी, माहिती अवलोकन रखडले

जळगाव : शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना शासकीय कार्यालयांमधील आवश्यक माहितीचे अवलोकन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव येथील सिव्हिल सर्जन कार्यालयात या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा प्रकार सोमवारी (३ ऑगस्ट) समोर आला.

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल अशोक कोल्हे यांनी माहितीचे अवलोकन करण्यासाठी ३ जुलै २०२६ रोजी सिव्हिल सर्जन कार्यालयाला ई-मेलद्वारे विनंती केली होती. मात्र तब्बल एक महिना उलटल्यानंतरही कार्यालयाकडून कोणतीही माहिती अथवा वेळ कळविण्यात आली नव्हती.

याबाबत सोमवारी कोल्हे यांनी सिव्हिल सर्जन डॉ. स्वप्नील सांगळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती अवलोकनाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात येऊन माहितीचे अवलोकन करण्यास सांगितले. त्यानुसार कोल्हे सिव्हिल सर्जन कार्यालयात गेले. तेथे कार्यालय अधीक्षक मिलिंद भडाळकर यांनी अवलोकन करण्यास हरकत नसल्याचे सांगून संबंधित लिपिकाला आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

मात्र काही वेळ टंगळमंगळ केल्यानंतर संबंधित लिपिकाने ज्या कपाटात संबंधित कागदपत्रे आहेत, त्या कपाटाची चावी एका व्यक्तीकडे असून तो बाहेरगावी असल्याचे सांगितले. त्यानंतर कोल्हे यांनी कार्यालय अधीक्षकांकडे आजच चावी मागवून उद्या माहितीचे अवलोकन करण्याची विनंती केली. त्यावर कार्यालय अधीक्षकांनी ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याकडे कपाटाची चावी राहून गेली असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे राहतो. तो गुरुवारी चावी आणून देईल, त्यानंतर माहितीचे अवलोकन करता येईल, असे सांगितल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

या घटनेमुळे एका अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आवश्यक कागदपत्रे असलेल्या कपाटाची चावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडेच राहणे ही गंभीर बाब मानली जात असून, त्या काळात संबंधित कागदपत्रांची तातडीची आवश्यकता भासली असती किंवा शासकीय कामकाज रखडले असते, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकारामुळे कार्यालयीन व्यवस्थापन, अभिलेखांचे संरक्षण तसेच शासनाच्या माहिती अवलोकन परिपत्रकाच्या अंमलबजावणीबाबत गंभीर त्रुटी समोर आल्याची चर्चा असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील मनमानी शुल्क रद्द करा; खेळाडू व नागरिकांसाठी संकुल मोफत खुले करा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची जोरदार मागणी.

Next Post

शेतकऱ्यांवरच धाडस? अहिल्यानगर RTO भरारी पथकाचा ‘पराक्रम’ नेमका कोणासाठी?

Next Post
शेतकऱ्यांवरच धाडस? अहिल्यानगर RTO भरारी पथकाचा ‘पराक्रम’ नेमका कोणासाठी?

शेतकऱ्यांवरच धाडस? अहिल्यानगर RTO भरारी पथकाचा 'पराक्रम' नेमका कोणासाठी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..