Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; चौकाचौकात पोलिसांचा पहारा, आरोपीला बेड्या, आमदार जगताप म्हणाले

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 9, 2026
in क्राईम
0
मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; चौकाचौकात पोलिसांचा पहारा, आरोपीला बेड्या, आमदार जगताप म्हणाले

जुन्या वादातून हल्ल्याची घडली घटना / भिंगार कॅम्प पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर । प्रशांत बाफना
शहरातील मुकुंदनगर भागातील दर्गादायरा कब्रस्तानजवळ जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी पाईप आणि लाकडी बांबूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्‌‍यात धीरज कचरुसिंग रजपूत (परदेशी) रा. माधवबाग, भिंगार) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अक्षय कैलास मुळे (वय 24, रा. बोल्हेगाव, मूळ रा. आळकुटी, पारनेर) याच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 4:10 वाजेच्या सुमारास आरोपी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद, युनुस शेख आणि इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी धीरज याला जीवे मारण्याच्या उद्देशाने गाठले.
याला मारून टाका असे म्हणत आरोपींनी हातातील लोखंडी पाईप व लाकडी बांबूने धीरजला बेदम मारहाण केली. हल्ल्‌‍यानंतर गंभीर जखमी झालेल्या धीरजला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल व त्यानंतर मॅक्स केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.

युनूस शेखला ठोकल्या बेड्या; तीन दिवसांची पोलीस कोठडी
मुकुंदनगर भागातील दर्गादायरा कब्रस्तानजवळ जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी पाईप आणि लाकडी बांबूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्‌‍यात धीरज कचरुसिंग रजपूत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौघांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे मुकुंदनगरमधील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. एसपी मुम्मका सुदर्शन यांनी तातडीने सुत्र हलवत हल्लेखोरांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पथके रवाना केली. हल्ल्यातील आरोपी युनुस शेख याला मुकुंदनरमधून रात्री अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता शेख याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील तर नागरी सुविधा द्यायच्या कशा…; महापालिका कर्मचारी युनियनने घेतला आक्रमक पवित्रा
अहिल्यानगर । प्रशांत बाफना
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंग राजपूत यांच्यावर मुकुंदनगर परिसरात काम करीत असताना दहा ते बारा जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्‌‍यात जखमी झालेल्या राजपूत यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने महापालिका प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार दमदाटी, शिवीगाळ तसेच कामात अडथळा आणण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर त्यांनी नागरिकांना नागरी सुविधा कशा द्यायच्या, असा सवाल उपस्थित करत हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास मुकुंदनगर परिसरातील नागरी सुविधा बंद करण्याचा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला.

यावेळी मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, सचिव आनंद वायकर, जितेंद्र सारसर, कैलास चावरे, बाळासाहेब गंगेकर, विजय कोतकर, किशोर कानडे, गुलाब गाडे, बलराज गायकवाड, सोमनाथ सोनवणे, सतीश ताठे, सोनू चौधरी यांच्यासह महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव आनंद वायकर म्हणाले की, महापालिका कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील तर कर्मचाऱ्यांनी नागरिकांना नागरी सुविधा कशा द्यायच्या? कर्मचाऱ्यांची थकीत देयके असतानाही ते शहरातील नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी काम करीत आहेत. मात्र, त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर ही गंभीर बाब आहे. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही, तर सोमवारपासून महापालिका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.

24 तासांत कारवाई न झाल्यास मुकुंदनगरमधील नागरी सुविधा बंद
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नगरकरांना विविध नागरी सुविधा देण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत. मात्र, काम करीत असताना कर्मचाऱ्यांवर हल्ले होणे ही गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असतील तर मुकुंदनगरमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी पाठविणे शक्य होणार नाही. 24 तासांच्या आत हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही, तर मुकुंदनगर परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आणि आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला आहे

पोलिसांनी कायमची अद्दल घडवावी
महानगरपालिकेचा कर्मचारी परदेशी सार्वजनिक काम करत असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना निंदनीय असून, आम्ही त्याचा निषेध करतो. पोलिसांनी खबरदारी घेऊन लवकर आरोपी अटक करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. यापूर्वी 2023 मध्ये अशा प्रकारची घटना घडली होती. या घटना जाणीवपूर्वक घडत आहे. पोलिसांनी अशा लोकांना कायमचा धडा शिकविणे गरजेचे आहे. पोलीस तपास लवकर होऊन आरोपी अटक झाला पाहिजे.
-संग्राम जगताप, आमदार

तरुणाची आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात जावून भेट घेतली.
मुकुंदनगर येथे प्राणघातक हल्ला झालेल्या तरुणाची आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात जावून भेट घेतली. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर काही हल्लेखोरांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता.7) घडली. या हल्ल्‌‍यात जखमी झालेल्या तरुणावर शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या तरुणाची अहिल्यानगर शहरात आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्याच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली. तसेच योग्य कारवाइचे प्रशासनाला आदेश दिले

Previous Post

अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

Next Post

मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

Next Post
मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..