
निंभोरा: प्रतिनिधि उमेश तायडे
निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी बुद्रुक (ता. रावेर) येथील हॉटेल व्यावसायिक फिर्यादी प्रवीण रमेश जैस्वाल यांनी दिनांक 29/07/2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आपली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. MH 19 EX 2679) घरासमोर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 05:30 वाजेच्या सुमारास पाहिले असता गाडी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार CCTNS गु.र.नं. 164/2026, BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने, मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर) श्री. अनिल बडगुजर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार निंभोरा पोलिसांनी परिसरात गस्त (Patrolling) वाढवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराने दिलेली माहितीचेआधारे पोलिसांनी संशयित आरोपी [आरोपीचे नाव] किरण उर्फ गफूर पीतांबर कोळी रा खिर्डी बु ता रावेर यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. व गुन्ह्यातील मो सायकल हजर केल्याने ती गुन्ह्यात मो सायकल
जप्त केलेला मुद्देमाल:
चोरीस गेलेली मोटारसायकल: होंडा युनिकॉर्न (काळा रंग) – क्र. MH 19 EX 2679
एकूण किंमत: रु. 70,000/-
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रिजवान पिंजारी करत आहेत.
तपास पथक:
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोहेकॉ किरण चाटे, पोकॉ सुभाष शिंदे, पो का सरफराज तडवी यांच्या पथकाने केली आहे.







