Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जिल्हाधिकारी साहेब, आपण कलावंतांवर आत्मदहनाची वेळ आणली!बीड जिल्ह्यातील कलाकार तीन वर्षांपासून मानधनापासून वंचित

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 26, 2026
in शासकीय
0
जिल्हाधिकारी साहेब, आपण कलावंतांवर आत्मदहनाची वेळ आणली!बीड जिल्ह्यातील कलाकार तीन वर्षांपासून मानधनापासून वंचित

बीड (प्रशांत बाफना) – गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील कलावंत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतून मिळणाऱ्या लाभापासून वंचित असल्याने कलावंतांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून येत्या आठ ते दहा दिवसात समितीची मीटिंग घेऊन मानधन वाटप करावे अन्यथा पुढील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलावंत मंडळी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कलावंतांवर आत्मदहन करण्याची वेळ आणल्याची एकच चर्चा जिल्हाभरात होऊ लागली आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या लाभार्थींना लाभ मिळत नाहीये तसेच कलाकार निवड समितीची बैठक सुद्धा अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी आणि सचिव सदस्य असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदस्य असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी घेत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील कलावंत लाभापासून वंचित आहेत.
अनेक वयोवृद्ध व ज्येष्ठ कलावंतांवर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली आहे. अशा कलाकारांमध्ये पुरुष कलाकारांसह महिला कलाकारांचा ही समावेश आहे. तसेच अनेक ज्येष्ठ महिला कलावंत या विधवा आहेत. तर अनेक पुरुष ज्येष्ठ कलाकार आपला उदरनिर्वाह “बुडत्याला काडीचा आधार” प्रमाणे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानधनावर चालवितात.
गेल्या तीन वर्षांपासून या योजनेसाठी गठीत केलेल्या समितीची सर्वसाधारण बैठक सुद्धा जिल्हाधिकारी यांनी अजून पर्यंत घेतलेली नाही. यामुळे शासनाकडून कलावंतांसाठी दरवर्षी येणारे कोट्यावधी रुपये अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे कलावंतांना मिळू शकलेले नाही.
शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची बैठक दरवर्षी घेऊन कलावंतांची निवड केली असती तर गेल्या तीन वर्षापासून शेकडो कलावंत मानधनापासून वंचित राहिले नसते.
मानधनाविना तीन वर्ष संपत आले तरीही समितीची ना बैठक घेण्यात येते, ना ज्येष्ठ कलावंतांना या योजनेतून लाभ मिळतोय. यामुळे सर्व ज्येष्ठ कलावंतांनी वैतागून सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असून येत्या आठ ते दहा दिवसात जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या योजनेचा व कलावंतांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून समितीची बैठक बोलावून कलाकारांची निवड करावी आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनाचा लाभ मिळवून द्यावा.
अन्यथा येत्या सप्टेंबर (२०२६) महिन्यात सर्व कलावंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला असून आता कलावंतांच्या या समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर चंद्रकांत लिंबाजी भालेराव, मोहन रुद्रा दराडे, लक्ष्मण नामदेव खेडकर, अशोक तुकाराम बुरंगे, छाया कोकाटे, महादेव कारभारी खेडकर, यांच्यासह इतरांची नावे व सह्या आहेत

Previous Post

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री .सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी श्रीम .स्नेहल वाळुंज

Next Post

अजिंठा हाउसिंग सोसायटीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस; बालकांचा जीव धोक्यात!

Next Post
अजिंठा हाउसिंग सोसायटीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस; बालकांचा जीव धोक्यात!

अजिंठा हाउसिंग सोसायटीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस; बालकांचा जीव धोक्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..