
उपसंपादक मन्सूर तडवी
नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र, मनपा क्वार्टर्स बिल्डिंग आणि त्या परिसरातील रस्ते व पथदिव्यांची (लाईट) अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या समस्यांबाबत शिवतेज संघटनेच्या वतीने नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष हारून शेख साहेब व राष्ट्रीय महासचिव योगेश ददणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, क्वार्टर्स बिल्डिंगची पडझड झाली असून रस्त्यावर खड्डे आणि परिसरात अंधार असल्याने नागरिकांना व कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर दुरुस्ती व स्वच्छतेची कामे करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संचालक तथा महाराष्ट्र अध्यक्ष जान्हवी ताई फाजगे, नाशिक जिल्हा सचिव नसरीन ताई शेख, संगीता ताई पगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.







