
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत प.न.लुंकड कन्या शाळा व शेठ ला.ना. सा.विद्यालयाच्या मैदानावर “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे” या विषयावरील कार्यशाळेचा शुभारंभ श्री.गणपती अथर्वशीर्ष पठणाने करण्यात आला.या प्रसंगी जळगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजु मामा भोळे ,शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे,सचिव श्री अभिजीत देशपांडे, ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस चे मुख्य प्रशासक डॉ.इंद्रजीत मोरे,ज्येष्ठ संचालक प्रा.शरच्चंद्र छापेकर,सहसचिव सौ. मीराताई गाडगीळ,सदस्य ॲड.श्री.पंकज अत्रे,समन्वयिका सौ.पद्मजा अत्रे, सौ.विजयालक्ष्मी परांजपे ,सौ प्रिया देशपांडे,सौ रेवती शेंदुर्णीकर,श्रीमती रजनी पाठक,श्री.अभय कुलकर्णी रोटरी चे नाशिक विभाग प्रांतपाल डॉ.राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष रत्नाकर पाटील,रोटरीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,सदस्य,सकाळ वृत्तपत्राचे संपादक श्री.सचिन जोशी,मूर्तिकार श्री.जयेश पाटील,श्री.महावीर सैतवाल ,श्री.राकेश विसपुते, दिव्या ढिंगरे,सौ.जमुना नन्नवरे,श्री. देवा सपकाळे,श्री.अक्षय पाचपोळ,श्री.सुनील दाभाडे,श्री.उल्हास सुतार,श्री. एल.झेड.कोल्हे,श्री.विजय वानखेडे,श्री.अक्षय पाचपोळ श्री.प्रेम सारस्वत,सौ.नीलिमा सपकाळे,श्री.नीलेश चौधरी शाळेचे मुख्याध्यापक सौ.लीना कुलकर्णी,श्री.सचिन देशपांडे, सौ.अपर्णा मुळे उपमुख्याध्यापक श्री.अनिल सेंदाणे श्री.संजय वानखेडे,पर्यवेक्षक सौ. रमा तारे,श्री.सुभाष पाटील ,श्री.जगदीश साळुंखे,आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळेस प्रत्येक टेबलजवळ एक मूर्तिकार या प्रमाणे 40 मूर्तिकार यांनी उपस्थित राहून पर्यावरण पूरक शाडू मातीचा वापर करून सुबक गणपती बाप्पा साकारून उपस्थित प्रत्येक ग्रुपमधील विद्यार्थांना प्रात्यक्षिकासह यथोचित मार्गदर्शन केले.त्यामुळे संस्थेच्या व इतर शाळांमधील जवळपास 3500 विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने सहभाग घेऊन विविध आकार व प्रकारच्या सुंदर , विलोभनीय श्री.गणपती बाप्पाच्या मूर्ती मोठ्या भक्तिभावाने साकारल्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांना टेबल क्रमांक,ग्रुप क्रमांक,शाडू माती, नाश्ता,पाण्याची बाटली आयोजकांकडून देण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,रोटरीचे स्वयंसेवक आपापल्या ड्रेसकोड मध्ये उपस्थित होते.श्री .गणरायांची मूर्ती साकारल्या नंतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.या उपक्रमासाठी शेठ ला.ना.विद्यालय व प.न.लुंकड कन्या शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व रोटरी स्वयंसेवक यांचे उत्तम सहकार्य लाभले.या उपक्रमाच्या शेवटी प्रमुख अतिथी मान्यवर तसेच ग्रेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस चे मुख्य प्रशासक डॉ.इंद्रजीत मोरे यांच्या हस्ते ग्रेट रेकॉर्डचे प्रमाणपत्र व ट्रॉफी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष
ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे व सचिव श्री.अभिजीत देशपांडे व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष श्री. रत्नाकर पाटील ,श्री.अभिजीत पाटील व सन्माननीय पदाधिकारी यांना प्रदान करण्यात येऊन संस्थेस सन्मानित करण्यात आले.तसेच सहभागी विद्यार्थांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले ,मूर्तिकारांचे स्वागत करण्यात आले..या उपक्रमाने समाजास ” पर्यावरणाचे संरक्षण करण्याबाबत” प्रभावी संदेश दिला .







