Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्रीराम माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीपांचा सन्मान – विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष अध्यापनाचा आनंद, उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 6, 2026
in शैक्षणिक
0
श्रीराम माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीपांचा सन्मान – विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष अध्यापनाचा आनंद, उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

मेहरून (जळगाव) प्रतिनिधी – गुरू-ब्रह्मा, गुरू-विष्णूच्या पावन परंपरेचा जागर करत श्रीराम माध्यमिक विद्यालयात दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व कृतज्ञतापूर्वक साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला.

विद्यार्थी झाले एक दिवसाचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी

या दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वी च्या निवडक विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन विविध विषयांचे अध्यापन केले. अध्यापनाचा खरा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकत होता.

कु. आलिया राजू शेख हिने एक दिवसाच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळत संपूर्ण शालेय कामकाजाची धुरा सांभाळली, तर पुष्कर चौधरी याने उपमुख्याध्यापक म्हणून तिला समर्थ साथ दिली. इतर विद्यार्थ्यांनी शिपाई, लिपिक अशा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतून शालेय प्रशासनाचा अनुभव घेतला.

मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचे मनोगत

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. बाळाजी सानप सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालाल वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाअध्यक्ष , संस्थेचे सचिव श्री. अशोकभाऊ लाडवंजारी, मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी सर, संचालक श्री. भगवान लाडवंजारी व शिक्षक श्री. अमित तडवी सर उपस्थित होते. मान्यवरांचे विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शिक्षक बनलेल्या खुशी माळी, पुष्कर चौधरी या विद्यार्थ्यांनी आपले अध्यापनाचे अनुभव कथन केले. तर वैष्णवी सिद्धार्थ, आलिया पिंजारी या विद्यार्थिनींनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची माहिती देत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी व शिक्षक श्री. अमित तडवी सर यांनी शिक्षक दिन का साजरा केला जातो? आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या महान कार्याचा आढावा घेतला.

अध्यक्षीय भाषणात श्री. बाळाजी सानप सर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्थेतर्फे श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्री. किरण पाटील सर, उपसांस्कृतिक प्रमुख श्री. दिनेश पाटील सर व सौ. प्रतिभा पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कोचुरे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

Next Post

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

Next Post
माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

September 6, 2026
श्रीराम माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीपांचा सन्मान – विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष अध्यापनाचा आनंद, उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

श्रीराम माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीपांचा सन्मान – विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष अध्यापनाचा आनंद, उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

September 6, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

September 6, 2026
देवळाली प्रवरा नगरपालिकेने ठेकेदार बदलला पण घाण कायम !आजा मेला नातू झाला असाच काहीसा प्रकार ?

देवळाली प्रवरा नगरपालिकेने ठेकेदार बदलला पण घाण कायम !आजा मेला नातू झाला असाच काहीसा प्रकार ?

September 6, 2026
ईकोच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे धक्कादायक रॅकेट उघड!

ईकोच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे धक्कादायक रॅकेट उघड!

September 6, 2026
अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..