
ता. चोपडा, जि. जळगाव :
ग्रामपंचायत मोहरद येथे अतिक्रमण ची पाहणी करण्यास आलेले विस्तार अधिकारी कुंदन कुमावत साहेब, व ग्रामविकास अधिकारी पंकज चव्हाण भाऊसाहेब यांच्यावर गावातील गुंड रुस्तुम इस्माईल, व आसिफ रुस्तुम या व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
सदर व्यक्तींनी त्यांच्याअतिक्रमण केलेल्या घरात ग्रामपंचायत मालकीचा हँडपँप असलेल्या जागेची जिल्हाधिकारी कार्यालया कडून आलेल्या आदेशा नुसार पाहणी करण्यास गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, या घटनेमुळे ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेचा लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधित आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणारे हल्ले थांबविण्यासाठी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, तसेच संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर आरोपीवर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ग्रामपंचायत कार्यालय हे विकासाचे केंद्र आहे; दहशत आणि हिंसाचाराचे ठिकाण नाही. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.” — अशी भूमिका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.







