
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे सहसंपादक श्री .भास्करराव भरसाकळ सर हे 15 सप्टेंबर रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण करीत आहेत सरांनी 50 वेळा वाढदिवसानिमित्त ने दोन झाडे लावण्याचा संकल्प केला होता प्रत्येक वर्षी वाढदिवसाला दोन नारळाची रोपे लावण्याचा त्यांनी निश्चय केला होता तिथून पुढे प्रत्येक वर्षी दोन झाडे लावून वाढदिवसाचे निमित्त सरांनी साधले मनात एक संकल्पना घेऊन आपल्या वयाएवढी झाडे लावण्याचा संकल्प सरांनी केला होता व सरांनी प्रत्येक वर्षी झाडे लावण्याचा सिलसिला प्रत्येक वर्षी चालू ठेवला गेल्या 23 ते 24 वर्षात 75 झाडे लावून केलेला संकल्प सरांनी पूर्ण केला .
अनेक प्रकारची फळझाडे सावलीची झाडे लावली गेली वयाची 23 वर्षात झाडांना फळे आली या झाडांची फळे सरांच्या मातोश्री यांनी ग्रहण केली व आजही सरांचे सर्व कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार या फळांचा आस्वाद घेत आहे त्यामुळे मोठे समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया श्री .भास्करराव भरसाकळ सर यांनी दिली दररोज भल्या पहाटे झाडांवर अनेक पक्षांची आवाज त्यांची किलबिल व त्यांचा चिव ची वाट ऐकू येतो त्यामुळे सकाळी सकाळी मनाला खूप समाधान मिळते केलेला संकल्प पूर्ण झाला त्याचे समाधान खूप मोठे वाटते व हे झाडे माझ्यासाठी झाडे नसून ती माझी मुले आहेत 75 मुलांचा पिता होण्याचा मान मला मिळाला असे श्री .भास्करराव भरसाकळ सर अभिमानाने सांगतात .
भविष्यात सतत झाडे लावण्याचा सिलसिला चालू ठेवण्याचा ही संकल्प सरांनी व्यक्तकेला असून माझ्या वाढदिवशी दोन नारळाची झाडे लावून वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याचे सरांनी सांगितले श्री .भास्करराव भरसाकळ सर यांना 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना संपादक .कार्यकारी संपादक .तसेच राहुरी तालुका प्रतिनिधी प्रविण पाळंदे या सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .







