
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
लोक कलावंत साहित्य परिषद व महाराष्ट्र राज्य लक्ष्मी माता मंदिर ट्रस्ट वडाळा महादेव (ता. श्रीरामपुर )यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष पद अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज तांदुळवाडी राहुरीचे राज्य कवी व लेखक श्री .मोहनी राज होन सर यांनी भूषवले.
श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालय आगाशे सभागृह येथे हे काव्य संमेलन उत्साहात संपन्न झाले विविध कवी – कवायीत्रिनी आपल्या दर्जेदार व भावस्पर्श कवितांचे सादरीकरण केले साहित्य कविता आणि सामाजिक जाणनीवांना प्रोत्साहन देणाऱ्या काव्य संमेलनासाठी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .







