Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खिर्डी बु. येथे पुन्हा घरफोडीचा धुमाकूळ!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 14, 2026
in क्राईम
0
खिर्डी बु. येथे पुन्हा घरफोडीचा धुमाकूळ!

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख २२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

रावेर तालुका प्रतिनिधी – उमेश तायडे

खिर्डी बु., ता. रावेर : रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे घरफोडीची आणखी एक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

याप्रकरणी शहनाज शेख अखतर (वय ४२, रा. खिर्डी बु., ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १८६/२०२६ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर बंद असल्याची संधी साधून चोरी

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते १४ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

२५ ग्रॅम सोने, ४०० ग्रॅम चांदी चोरीला

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा हार, सोन्याची पोत तसेच चांदीच्या दोन छन्न्या यांचा समावेश आहे. एकूण २५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४०० ग्रॅम चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

बचत गटाच्या रकमेसह ८९ हजारांची रोकड लंपास

चोरट्यांनी ओम साई राम बचत गटाच्या भरणा रकमेसह ५४ हजार रुपये, तसेच घरातील अन्य ३५ हजार रुपये, अशी एकूण ८९ हजार रुपयांची रोकडही लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून ३ लाख २२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

दोन महिन्यांत दोन घरफोड्या; पुन्हा चोरीने नागरिकांची चिंता वाढली

दरम्यान, खिर्डी परिसरात मागील दोन महिन्यांत दोन घरफोडीच्या घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच यापूर्वी घडलेल्या घरफोडीच्या घटनांचा तपासही गतीने पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान

या घटनेनंतर निंभोरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालणे आणि आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोरचे महत्त्वाचे आव्हान ठरले आहे.

सपोनि मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभय ढाकणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रिजवान पिंजारी पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

प्राचार्य होन सरांनी भूषवले काव्य संमेलनाचे अध्यक्ष पद

Next Post

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला

Next Post
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच,जरांगे पाटलांनी डाव टाकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..