
राहुरी तालुका प्रतिनिधी – ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा सण २०२६ – २७ राहुरी येथील कृषी विद्यापीठ मधील क्रीडा भवन येथे नुकत्याच पार पडल्या .
सदर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संलग्न असणारे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थिनी कु.पूजा रेवन्नाथ शिंदे हिने मुलींच्या सतरा वर्ष वयोगटात गोळा फेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे .
कु .पूजा शिंदे ही विद्यार्थिनी तालुक्यात गोळा फेक स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल तिचे डॉ .तनपुरे सह .साखर कारखान्याचे चेअरमन श्री .अरुण साहेब तनपुरे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी व तनपुरे कारखान्याचे संचालक श्री .हर्ष तनपुरे संचालक भारतराव वारुळे सर संचालक कृष्णा मुसमाडे संचालक अरुण खुरुद विद्यालयाचे प्राचार्य श्री .बी एल .शिरसाट सर पर्यवेक्षक चव्हाण सर विद्यालयाचे कलाध्यापक श्री .विशाल तागडसर धावडे सर लांडगे सर नाईक सर त्याचबरोबरं कु .पूजा शिंदे हिला सदर स्पर्धेत विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री .अभयसिंह पाटील सर यांचे मोलाची मार्गदर्शन लाभले आहे .शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे पालक नागरिक यांनी कु .पूजा शिंदे हिचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहेत .







