Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगावात ४ ऑक्टोबरला भव्य ‘जन आक्रोश महामोर्चा’; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची हाक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 28, 2026
in सामाजिक
0
जळगावात ४ ऑक्टोबरला भव्य ‘जन आक्रोश महामोर्चा’; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची हाक

जळगाव: अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी तसेच आरक्षणात बदल न करण्याच्या मागणीसाठी येत्या ४ ऑक्टोबर २०२६ (रविवारी) रोजी जळगाव येथे भव्य ‘जन आक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव जिल्हा’ यांच्यावतीने हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आला आहे.

हा महामोर्चा दुपारी २ वाजता सुरू होईल. मोर्चाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक, जळगाव येथून होईल. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आपले निवेदन सादर करणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला असून, यामुळे अनुसूचित जाती समूहामध्ये फूट पाडण्याचा कुटील डाव आखला आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. उपवर्गीकरण हे पूर्णतः संविधान विरोधी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संविधान विरोधी आणि धर्मांध-जात्यंध शक्तींना सर्व शक्तीनी विरोध करण्यासाठी तसेच अनुसूचित जातीमध्ये एकता व अखंडता टेवण्यासाठी या महामोर्चात लाखांच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

या महामोर्च्याद्वारे आयोजकांनी खालीलप्रमाणे १० प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

१) अनुसूचित जातीला मिळालेल्या घटनादत्त आरक्षणात कोणत्याही प्रकारे बदल करण्यात येऊ नये.
२) अनुसूचित जातीला मिळालेल्या घटनादत्त आरक्षणास अर्थिक निकष लावण्यात येऊ नये.
३) अनुसूचित जातीला मिळालेल्या घटनादत्त आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये.
४) अनुसूचित जातीला मिळालेल्या घटनादत्त आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मान्य करण्यात येऊ नये.
५) महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी.
६) खाजगी उद्योग, संस्था, कंपन्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आरक्षण लागू करण्यात यावे.
७) अनुसूचित जातीतील जनेतर निर्माण केलेला जातीय संघर्ष दंड करण्यात यावा.
८) उपवर्गीकरणाच्या नावाखाली कण्टाळेत येत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी रोखण्यात यावी.
९) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर तर कठोर कारवाई करण्यात यावी.
१०) अनुसूचित जातीच्या नोकऱ्यांमधील अनुशेष ताबडतोब भरण्यात यावा.

या महामोर्च्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मा. आनंदराज आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा सेनानी स्पिलकिन सेना), ना. रामदासजी आठवले (केंद्रीय समाजकल्याण मंत्री), प्रा. जोगेंद्र कवाडे (लॉन्गमार्च प्रणेते), मा. बबनराव घोलप (माजी समाजकल्याण मंत्री), खा. चंद्रकांत हंडोरे (माजी समाजकल्याण मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष भीमशक्ती), आणि मा. दिपक केदार (राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया दलीत पॅंथर सेना) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

समाज बांधवांना आवाहन

तमाम अनुसूचित जातीच्या तथा आंबेडकरवादी जनेतला या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव’ यांनी केले आहे. “देख लेना ऑखोंसे – हम भी आएँगे लाखोंसे” अशी घोषणा देत संपूर्ण समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

कु .पूजा शिंदे गोळा फेक स्पर्धेत राहुरी तालुक्यात प्रथम

Next Post

तांभेरे सारख्या खेडेगावातील प्रा .साहेबराव गागरे यांनी मिळवली राजस्थान येथील विद्यापीठ मधून पी एचडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..