
उपसंपादक मन्सूर तडवी
यावल आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी “आदिवासी तडवी भिल्ल समाज महापंचायत” गठीत झाली पाहिजे यानिमित्ताने हरिपुरा तालुका यावल येथे दिनांक 17 मे 26 रोजी आदिवासी तडवी भिल समाज मुंबई ठाणे नाशिक रत्नागिरी तसेच जळगाव जिल्ह्यातून मोठ्या जनसंख्याने उपस्थित राहून उत्साहाच्या वातावरणात मीटिंग पार पडली होती या महापंचायतीत अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सदस्य यांची नेमणूक करण्यासाठी तसेच समाजाची एकजुट वाढवणे आणि शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी अशी एकमुखाने चर्चा करण्यात आली होती त्यानंतर 7 जुलै2026 रोजी यावल येथे
महापंचायतीत निवृत्त अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवकांची राज्यस्तरीय कार्यकारणी स्थापन करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी रशीद सुभान तडवी तर सचिव पदी लुकमान इस्माईल तडवी उपाध्यक्ष मासूम रहीमान तडवी उपाध्यक्ष जफरूला अमानुल्ला जमादार सहसचिव रशीद अकबर तडवी सल्लागार मुनाफ जुम्मा तडवी. बबन लालखा तडवी. मनेश रज्जाक तडवी. हबीब नबाब तडवी. राजू बीराम तडवी कार्याध्यक्ष मीना राजू तडवी खजिनदार हनीफ हुसेन तडवी. हिशोब तपासणीस मुक्तार फकीरा तडवी राज्य प्रसिद्ध प्रमुख पत्रकार मन्सूर सबाज तडवी सह हिशोब तपासणीस लुकमान कलिंदर तडवी राज्य सदस्य नजमा इरफान तडवी मुबारक फत्तु तडवी हुसेन जमादार .नशीर इब्राहिम तडवी उस्मान रमजान तडवी फिरोज अब्बास तडवी हुसेन जहांगीर तडवी मुराद जुम्मा तडवी फकीरा दगडू तडवी यांची एकमताने निवड करण्यात आली ही टीम स्वतंत्र न राहता सर्व आदिवासी संघटनांचा एक घटक म्हणून काम करणार आहे.
महापंचायतीचे प्रमुख उद्देश:
1. शिक्षणावर भर: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शैक्षणिक मदत केंद्र सुरू केले जाणार.
2. बँड-डीजे खर्चावर लगाम: महागाईच्या काळात होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी लग्न साधेपणाने करण्याचे आवाहन.
3. महिला सक्षमीकरण: महिलांना बचत गट, स्वयंरोजगार आणि कायदेशीर मार्गदर्शनासाठी विशेष पुढाकार.
4. अन्यायाला विरोध: आदिवासींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात कायदेशीर मदत देण्यासाठी टीम तयार.
5. संस्कृती जतन: तडवी भिल्ल समाजाची भाषा, सण आणि परंपरा जपण्यासाठी युवा पथके स्थापन.
महापंचायतीच्या शेवटी “शिक्षित समाज, सशक्त समाज” हा संदेश देण्यात आला.







