Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी रावेर तालुक्यात जनजागृती; १० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 7, 2026
in सामाजिक
0
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी रावेर तालुक्यात जनजागृती; १० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रावेर | प्रतिनिधी – उमेश तायडे
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा कृती समिती, रावेर तालुक्याच्या वतीने सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि भावी पिढीच्या भवितव्याच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते गावोगावी भेटी देत नागरिकांशी संवाद साधत असून, समाजबांधवांना संघटित होऊन आगामी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.
समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात, ही केवळ एका व्यक्तीची किंवा एका संघटनेची लढाई नसून समाजाच्या स्वाभिमानाची, संविधानिक हक्कांच्या संरक्षणाची आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्याची लढाई असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
यासाठी सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गावातील जास्तीत जास्त समाजबांधवांसह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.
“आज आपण एकजूट दाखवली तर उद्याचे भविष्य सुरक्षित राहील. आपली एकजूट हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे,” असे समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेशही यावेळी अधोरेखित करण्यात आला आहे.
या जनजागृती अभियानाला रावेर तालुक्यातील विविध गावांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

शेतकऱ्यांवरच धाडस? अहिल्यानगर RTO भरारी पथकाचा ‘पराक्रम’ नेमका कोणासाठी?

Next Post

पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

Next Post
पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..