Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 9, 2026
in क्राईम
0
अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांसह कंपनीच्या कर्मचार्‍यांवर लाकडी बांबू व लोखंडी पाइपने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात धीरज रजपूत (परदेशी) गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी महापालिकेचा वायरमन युनुस शेख (रा. मुकुंदनगर) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अन्य संशयित आरोपी पसार असून, भिंगार कॅम्प पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

या प्रकरणी अक्षय मुळे (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ई-स्मार्ट कंपनीत कार्यरत असून या कंपनीने महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम घेतले आहे. कंपनीत अक्षय बोरुडे हे सुपरवायझर, तर धीरज रजपूत व काव्या तावरे हे हेल्पर म्हणून काम करतात. फिर्यादीनुसार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी महापालिकेचा वायरमन युनुस शेख याने अक्षय मुळे यांना फोन करून मुकुंदनगर येथे स्ट्रीट लाईटच्या कामासाठी तातडीने येण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास कंट्रोल रूममध्ये आलेल्या तक्रारीनुसार मुळे, रजपूत, तावरे व अक्षय बोरुडे हे टेम्पोतून दर्गा दायरा परिसरात स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले. तेथे त्यांनी मेन पॅनलचे काम पूर्ण केले. त्यावेळी वायरमन शेख तेथे उपस्थित होता. त्याने दर्गा दायरा कब्रस्तान परिसरातील दोन-तीन स्ट्रीट लाईट बंद असल्याचे सांगून त्या दुरुस्त करण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीचे कर्मचारी दर्गा दायरा परिसरात गेले.

बोरुडे हे स्ट्रीट लाईट तपासण्यासाठी बंगल्यावर चढले. काव्या तावरे व अक्षय बोरुडे हे मेन लाईट बंद करण्याबाबत फोनवरून बोलत असताना अचानक आरडाओरड झाल्याचा आवाज आला. फिर्यादीनुसार, काहीजण धीरज रजपूत यांना घेरून लाकडी बांबू व लोखंडी पाइपने मारहाण करीत होते. हल्लेखोरांकडून धीरज यांना उद्देशून इसको मार डालो असे म्हणत मारहाण करण्यात येत होती. हा प्रकार पाहून सहकार्‍यांनी आरडाओरड करून हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर लाईट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलीवरून तसेच पायी पळून गेले. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या धीरज रजपूत यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी महापालिकेचा वायरमन युनुस शेख याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या हल्ल्यामागे पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. भिंगार कॅम्प पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके पसार आरोपींचा शोध घेत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण तसेच या घटनेमागील इतर बाबींचा तपास सुरू आहे

Previous Post

पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

Next Post

मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; चौकाचौकात पोलिसांचा पहारा, आरोपीला बेड्या, आमदार जगताप म्हणाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..