
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
नगर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदार संघातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्न प्रलंबित विकास कामे तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध विषयावर आ .अक्षय कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली
या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकास कामांना गती देणे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावणे तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मूलभूत सुविधांचा कामान कामांना प्राधान्य देण्याबाबत आ.कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना शासन स्तरावरूसहकार्य मिळावे आणि संबंधित विभागामार्फत त्याची प्रभावी अंबरबजावणी व्हावी यासाठी आ .कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करून आवश्यक त्या कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांना लवकरच गती मिळून ते मार्गी लागतील असा विश्वास आ .अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला .







