Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

समाजसेवेची दखल घेत राजू सवर्णे यांचा गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘समाजसेवी’ पुरस्कार प्रदान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 12, 2026
in सामाजिक
0
समाजसेवेची दखल घेत राजू सवर्णे यांचा गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘समाजसेवी’ पुरस्कार प्रदान

जळगाव : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेत दैनिक नवराष्ट्रच्या वतीने जळगाव येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात निंभोरा सिम येथील माजी सरपंच तथा सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजू भाऊ सवर्णे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ‘समाजसेवी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजू सवर्णे यांनी सामाजिक जीवनात विविध उपेक्षित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य केले आहे. दलित वस्ती पुनर्वसनाचा प्रश्न, तसेच विधवा, परितक्त्या, वयोवृद्ध, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राजू सवर्णे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश मामा भोळे यांच्यासह दैनिक नवराष्ट्र समूहाचे पत्रकार आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानामुळे निंभोरा सिम परिसरासह सामाजिक क्षेत्रातून राजू सवर्णे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

रावेर तालुका प्रतिनिधी – उमेश तायडे

Previous Post

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गाव PESA क्षेत्रात समाविष्ट करा; 15 सप्टेंबरपासून उपोषण

Next Post

जळगाव जिल्हा आदिवासी विकास पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन मनेष तडवी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..