Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जिल्हा बँकेचा चेअरमन पदावर डॉ .सुजय विखे यांची वर्णी लागणार ?मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील व्यक्तव्यामुळे चर्चेला उधान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 12, 2026
in राजकीय
0

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अद्याप जाहीर नसली तरी राजकीय घडामोडी जोरदारपणे सुरू आहे आगामी काळात बँकेच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या हाती जाणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरू झाले आहेत यामध्ये डॉ .सुजय विखे पाटील यांच्या नावाची ही चर्चा सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भूमिका त्यांनी मांडली होती त्यांच्या या व्यक्तव्यमुळे जिल्हा बँकेच्या आगामी नेतृत्वाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे आगामी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये डॉ .सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषदेचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नही केले होते व त्यांच्यामध्ये ते यशस्वी झाले तर डॉ .सुजय विखे पाटील यांनी ठरविले असते तर ते विधान परिषदेवर आमदार पदी विराजमान झाले असते त्यांची जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी किंवा शिर्डी संस्थांच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते .

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सोसायटी व कारखान्यांना अर्थसहाय्य केले जाते त्यामुळे बँकेच्या आगामी नेतृत्वाचा प्रश्न हा केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही तर त्याला जिल्ह्यातील राजकीय समीकरण च्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होते याच पार्श्वभूमीवर डॉ .सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे व लक्षवेधी ठरत आहे .
सध्या डॉ .सुजय विखे पाटील हे उत्तर व दक्षिण नगर जिल्ह्यात सर्वच कार्यक्रमांना भेटीगाठी देत असल्याने त्यांची निश्चितच जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी वर्णी लागते की काय याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे .
मात्र अद्याप जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही त्यामुळे सध्या कोणाचे नाव निश्चित झाले आहे किंवा कुणाची निवड होणार आहे असे ठामपणे सांगता येणार नाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच संचालक मंडळातील समीकरणे प्रत्येक गटाची भूमिका आणि चेअरमन पदासाठी ची प्रत्यक्ष राजकीय हालचाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे .
डॉ .सुजय विखे पाटील यांनी निर्णयाची दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे सांगितल्याने आता या पदासाठी वरिष्ठ पातळीवरून कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नावावर निर्णय होतो की सहकार क्षेत्रातील अन्य अनुभवी व्यक्तीला संधी दिली जाते हे आगामी घडामोडीवर स्पष्ट होणार आहे .
दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडनुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो आणि त्यानंतर राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे त्यामुळे सध्या डॉ .सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरी अंतिम निर्णय पासून हे प्रकरण अद्याप दूर आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच या चर्चेला अधिकृत दिशा मिळणार असल्याने आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

Previous Post

पिंप्राळा हुडकोमध्ये बाप्पांचे दिमाखदार आगमन; १२ फूट उंच गणेशमूर्ती ठरतेय आकर्षण

Next Post

जिल्हा बँकेचा चेअरमन पदावर डॉ .सुजय विखे यांची वर्णी लागणार ?मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील व्यक्तव्यामुळे चर्चेला उधान

Next Post
चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गाव PESA क्षेत्रात समाविष्ट करा; 15 सप्टेंबरपासून उपोषण

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गाव PESA क्षेत्रात समाविष्ट करा; 15 सप्टेंबरपासून उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..