
राहुरी तालुका प्रतिनिधी – ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यामधील तांभेरे या छोट्याशा गावातील रहिवासी असणारे प्रा .साहेबराव गागरे यांनी राजस्थान येथील श्री .जगदीश प्रसाद झाबरमल टिबेवाला विद्यापीठ झुनझुन राजस्थान या विद्यापीठाने श्री .प्रा.साहेबराव गागरे यांना नुकतीच पीएचडी पदवी बहाल केली आहे .
राहता तालुक्यातील लोणी येथील लोकनेते डॉ .बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ .विठ्ठल राव विखे पाटील यांच्या संलग्न असणाऱ्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांचे संगणक शास्त्र विभागाचे साहेबराव गागरे हे प्राध्यापक आहेत .
डेटा सायन्स तंत्रज्ञानाच्या साह्याने नगरपालिका घनकचरा हाताळणी पद्धत या विषयावर प्रा .साहेबराव गागरे यांनी संशोधन केले होते त्यांना या संशोधनाकामी डॉ .प्रसाद पेद्धी सर तसेच डॉ .बी .बी .आमले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .
घनकचरा व्यवस्था ना सारखा महत्त्वाचा विषयाला आधुनिक डेटा सायन्स तंत्रज्ञानाची जोड देत प्रा .साहेबराव गागरे यांनी केलेले हे संशोधन पर्यावरण आणि नगरपालिका व्यवस्थापनेचा दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांना मिळालेली पीएचडी ही पदवी त्यांना मिळाली नसून त्यांनी केलेल्या कष्टाला अर्थक श्रमाला व ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे त्यांना मिळाली असून मी प्रा .साहेबराव गागरे यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने व विखे परिवाराचे वतीने हार्दिक अभिनंदन करत असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मा . अध्यक्षा सौ .शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले
प्रा .साहेबराव गागरे यांना मिळालेल्या पीएचडी बद्दल व त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के माजी खासदार सुजय दादा विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील शिक्षण संचालक तथा प्राचार्य प्रो .डॉ .प्रदीप दिघे व उपप्राचार्य डॉ .राम पवार त्याचबरोबर येथील श्रीराम जन्मोत्सव समितीचे रामदास गागरे राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मच्छिंद्र गागरे आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .
प्रा .साहेबराव गागरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे लोणी व तांभेरे परिसरातून व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .







